Join us  

आंब्याची पेटी घेऊन विमानतळावर दिसला मराठमोळा अभिनेता; म्हणाला, 'फळांचा राजा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:16 AM

आंबा तोही देवगड हापूस मग काय....

मे महिना सुरु आहे आणि या महिन्यात घरोघरी आंब्याच्या पेट्या आणल्या जातात. कुटुंबातले सर्वजण मिळून आमरसावर ताव मारतात. त्यात देवगड, रत्नागिरीचा हापूस आंबा म्हणलं की विचारायलाच नको. या फळांचा राजा आंब्याचे सेलिब्रिटीही चाहते आहेतच. मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) विमानातूनच आंब्याची पेटी घेऊन आला आहे. विमानतळावरुन येताना खांद्यावर आंब्याची पेटी घेतलेले फोटो त्याने पोस्ट केलेत. तसंच  यासोबत इंटरेस्टिंग कॅप्शन लिहिलं आहे.

संतोष जुवेकरच्या एकंदर लुक्स आणि अभिनयावर प्रेक्षक फिदा असतात. लवकरच तो बॉलिवूडमध्ये विकी कौशलसोबत 'छावा' सिनेमात झळकणार आहे. नुकतीच त्याने केलेली एक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. संतोषने आंब्याची पेटी विमानातून आणली असून त्याने लिहिले, "फळांचा राजा आंबा आणि तोही देवगड हापूस मग त्याला असं ट्रेनआणि गाडीने कसं बर आणायचं घरी म्हणून विमानाने घेऊन आलो. शेवटी आमच्या कोकणाची शान आहे हा आणि घरीपण लवकर पोहोचता येईल. आणि मग लगेच ..... ढ्यानंटा...... डॅन्ड!!!!सापसूप !!!"

संतोषची ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनाही जाम हसू आलंय. आंबा खाण्याची घाई आणि ट्रेन किंवा गाडीमधून कसं आणायचं म्हणून त्याने थेट विमानाचाच पर्याय निवडला. 'खरं सांग आंबा धक्काबुकीत पिछकु नये म्हणून तू वि

संतोष जुवेकर बऱ्याच वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. मालिका, सिनेमांमधून त्याने अभिनयाची छाप पाडली. 'वादळवाट','या गोजिरवाण्या घरात','बेधुंद मनाच्या लहरी' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तो दिसला. तर 'झेंडा','मोरया','शाळा' या मराठी सिनेमांमध्ये त्याने काम केलं.

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेताआंबाविमानतळव्हायरल फोटोज्सोशल मीडिया