Join us
Daily Top 2Weekly Top 5

संकर्षण कऱ्हाडेनं घेतला पावसाचा आनंद; चाहत्यांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 09:06 IST

पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी आहे.

पावसात भिजण्याची मज्जाच वेगळी आहे. दरवळणारा मातीचा सुगंध देखील प्रत्येकाला आवडतो. लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पावसात भिजायला आवडते. मुंबईत नुकतचं पावसाचं आगमन झालंय.  संपूर्ण मुंबईकरांनी पावसाचा आनंद घेतला. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेदेखील (sankarshan karhade) मनसोक्त पावसाचा आनंद घेतला.

संकर्षणने पावसात भिजल्यानंतरचा आनंद एक पोस्ट शेअर करत व्यक्त केला आहे. या फोटोमध्ये तो भिजल्याचं दिसून येत आहे. 'भिजलो. मुंबईचा पाऊस', असं कॅप्शन देत त्याने ही खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. कमेंट करत एका युजरने लिहलं, 'काळजी घ्या सर आजारी पडाल'. तर एकाने लिहलं, 'नाटकाचे प्रयोग बघताना आम्हीही मनोरंजनाच्या पावसात असच भिजून जातो'.

संकर्षण कऱ्हाडे हा कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय आहे. आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत चाहत्यांचा लाडका झाला आहे. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम त्याच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतो. संकर्षण हा सध्या त्याच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजत आहे. या नाटकात संकर्षण व अमृता देशमुख ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय.  

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीपाऊसमुंबई