Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार, म्हणाले-अतिशय नम्रपणे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 19:31 IST

रंगमंच दणाणून सोडणारा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

मराठी रंगभूमी गाजवलेले नट असं म्हटलं तर आपल्या सर्वांसमोर एकच नाव उभं राहतं ते  म्हणजे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं. आजवर प्रशांत दामलेंनी बऱ्याच नाटकात काम केले आहे. मराठी रंगभूमी जगलेला नट म्हणून प्रशांत दामलेंची ओळख आहे. आज राष्ट्रपतींच्या हस्ते अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं. त्यानिमित्ताने अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्कार मिळाला आहे.

प्रशांत दामले सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहते. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रशांत दामले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना दिसतायेत.  हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले, हा खुप मोठ्ठा सन्मान आहे. माझ्या सर्व सहकलाकारांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या सर्व बॅक स्टेज कलाकारांच्या वतीने आणि फक्त महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगातल्या मराठी नाट्य रसिकांच्या वतीने मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारत आहे. चाहत्यांसह कलाकारांकडून प्रशांत दामले याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कलाक्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलं आहे. 

रंगमंच दणाणून सोडणारा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपट, नाटकं करणारे प्रशांत दामले यांच्याकडे आज गुणी आणि अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलं जातं.

 

टॅग्स :प्रशांत दामलेराष्ट्राध्यक्ष