Join us

मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट ’बकाल’चा ट्रेलर प्रदर्शित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 10:12 IST

बकालच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला चैतन्य मेस्त्री हा स्वत: ॲक्शनसीन्स आणि स्टंट्स करणारा पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार मिळाला आहे. 

समीर आठल्ये दिग्दर्शित मराठीतील पहिला भव्य ॲक्शनपट बकालचा टीजर नुकताच सोशल मिडीयावरून प्रदर्शित करण्यात आला. थरारक ॲक्शन्स, हृदयाचा ठोका चुकविणारे स्टंट्स आणि डान्स-म्युझिकची जबरदस्त ट्रीट प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे ट्रेलरवरून दिसतेय. बकालच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला चैतन्य मेस्त्री हा स्वत: ॲक्शनसीन्स आणि स्टंट्स करणारा पहिला ॲक्शन-डान्सिंग स्टार मिळाला आहे. 

विदर्भात बकाल नावाच्या एका समाजविघातक कारवाया करणाऱ्या टोळीचा एका समांतर सुरक्षा सेनेने आश्चर्यकारकरित्या विनाश केला होता. ह्या सत्यघटनेवर आधारीत बकाल चित्रपटाची कथा आहे. ट्रेलर पाहून ह्या सिनेमाची भव्यता लक्षात येते. चैतन्यने स्वत: केलेल्या काही थरारक स्टंट्स आणि ॲक्शनची झलक ट्रेलरमध्ये दिसते. त्यावरून  ॲक्शनफिल्म्स पाहणाऱ्या प्रेक्षकांना आणि खास करून मराठी चित्रपट रसिकांना आजवर मराठी चित्रपटात कधीही न पाहायला मिळालेली बॉलिवूडच्या तोडीची ॲक्शन एंटरटेनमेन्ट सिनेमात पाहायला मिळेल, ह्यात शंका नाही. अशोक समर्थ, अलका कुबल, गणेश यादव, यतीन कारेकर, मिलिंद गवळी, असीत रेडीज, जयंत सावरकर, पुजा नायक आदी मातब्बर कलावंतांचा अभिनय ‘बकाल’ ह्या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शिव ओम व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत बकाल हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

टॅग्स :अलका कुबल