Join us

मानसी मोघे मराठी चित्रपटात

By admin | Updated: August 18, 2014 04:59 IST

मिस इंडिया दिवा आणि त्यानंतर मिस युनिव्हर्समध्येही भारताचे प्रतिनिधित्व केलेली मानसी मोघे लवकरच आपल्याला एका मराठी सिनेमातून अभिनय करताना दिसणार आहे.

मिस इंडिया दिवा आणि त्यानंतर मिस युनिव्हर्समध्येही भारताचे प्रतिनिधित्व केलेली मानसी मोघे लवकरच आपल्याला एका मराठी सिनेमातून अभिनय करताना दिसणार आहे. मॉडेलिंग विश्व गाजवणारी मराठमोळी मानसी आता ‘बुगडी माझी सांडली गं’ हा लावणीप्रधान सिनेमा करतेय. इतरांप्रमाणे बॉलीवूडची वाट चोखाळायच्या ऐवजी तिने पदार्पणासाठी निवडलाय चक्क मराठी सिनेमा. ‘बुगडी...’चं दिग्दर्शन केलंय मानसिंग पवार यांनी, तर मानसीचा हीरो आहे तप्तपदी फेम कश्यप परुळेकर. मिस इंडियाच्या टॅलेंट राऊंडमध्येसुद्धा मानसीने एक ठसकेदार लावणी सादर केली होती. या सिनेमातही ती लावण्या सादर करणार आहे. त्यासाठी नृत्यदिग्दर्शक दीपाली विचारेंकडून मानसी लावणीचे धडे घेतेय. मूळची मध्य प्रदेशची असलेल्या मानसीचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यामुळे तिला मराठीची चांगलीच जाण आहे. तिचा सिनेमा कसा काय प्रभाव पाडतोय ते पाहावे लागेल.