Join us  

'मला आई व्हायचं होतं पण...' मनीषा कोईरालाने मूल दत्तक न घेण्याचं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 1:38 PM

संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मधून तिने दमदार कमबॅक केले आहे.

90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala)  सध्या 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. कॅन्सरवर मात  केल्यानंतर मनीषाने 'मल्लिकाजान' या भूमिकेतून अनेक वर्षांनी दमदार कमबॅक केले आहे. सध्या ती अनेक ठिकाणी सीरिजनिमित्त मुलाखती देत आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत मातृत्वाचा अनुभव न मिळाल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं. तसंच तिने आजपर्यंत मूल दत्तक का नाही घेतलं याचं कारणही सांगितलं.

मुलाखतीत मनीषा म्हणाली, "मला आई व्हायचं आहे. आजही मी याबद्दल विचार करते. पण मी आता ही गोष्ट स्वीकारली आहे की मला मूल नाहीए. अनेकदा मी मूल दत्तक घ्यायचा विचार केला. पण मला याची जाणीव झाली की मी खूप टेन्शन घेते. अस्वस्थ असते. त्यामुळे मी याचा विचार सोडला आणि वाटलं गॉडमदर होणं जास्त चांगलं आहे.जे आहे त्यासोबत चांगलं आयुष्य जगायला शिकलं पाहिजे."

काही वर्षांपूर्वीच मनीषाचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर ती मूल दत्तक घेणार होती मात्र नंतर तिने आयडिया ड्रॉप केली. तेव्हा तिने मुलाखतीत सांगितले होते की सध्या तिच्याकडे मुलासाठी वेळच नाहीए. जेव्हा मी त्याला पूर्ण वेळ देऊ शकेल तेव्हा मी मूल दत्तक घेईन असं ती म्हणाली होती.

मनीषाने कॅन्सरवर मात केली आहे. यानंतर तिच्यात बरेच बदल झाले होते. अनेक गोष्टी ती शिकली. संकटांचा सामना केला. घटस्फोट, कॅन्सर यामुळे ती एकटी पडली होती. कामातूनही तिने आधीच ब्रेक घेतला होता. रणबीर कपूरच्या 'संजू' सिनेमात तिने त्याच्या आईची भूमिका साकारली होती. तर आता संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मधून तिने दमदार कमबॅक केले आहे.

टॅग्स :मनिषा कोईरालाबॉलिवूडवेबसीरिजलहान मुलं