Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड डेब्यूआधी पुन्हा एकदा दिसला अंकिता लोखंडेचा हॉट अवतार, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 19:34 IST

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा ‘मणिकर्णिका-द क्वीन आॅफ झांसी’ हा डेब्यू सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा ‘मणिकर्णिका-द क्वीन आॅफ झांसी’ हा डेब्यू सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. कंगना राणौत हिच्यामुळे हा चित्रपट काहीसा वादात असला तरी अंकिताला त्याची चिंता नाही. आपला डेब्यू होतोय आणि एका ऐतिहासिक चित्रपटातून डेब्यू होतोय, हे तिच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. साहजिकचं यामुळे अंकिता जाम आनंदी आहे. याच आनंदाच्या भरात एका पाठोपाठ एक असे सेक्सी अन् बोल्ड फोटोशूट करण्याचा धडाका तिने लावलाय. ‘संस्कारी बहू’च्या भूमिकेत दिसणारी अंकिता पर्सनल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आणि हॉट आहे. तिचा असाच एक हॉट अंदाज दाखवणारे फोटोशूट सध्या चर्चेत आहे. अंकिताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. काहीच तासांत या फोटोंना हजारांवर व्ह्युज आणि लाईक्स मिळालेत. निश्चितपणे अंकिता या फोटोतून प्रचंड ग्लॅमरस दिसतेय. तुम्हीही अंकिताचे हे फोटो पाहा आणि ते कसे वाटलेत, ते जरूर लिहा.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे लोकप्रीय झालेली अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. यात अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौयार्ने आणि बुद्धिचातुयार्ने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल््यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते.

या चित्रपटाशिवाय संजय दत्तसोबतही तिने एक चित्रपट साईन केल्याची खबर आहे. यात ती महिला पोलिसाची भूमिका साकारणार असेही कळतेय.

 

टॅग्स :अंकिता लोखंडेमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौत