Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदना करीमीने इंस्टाग्रामला केले रामराम, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 19:17 IST

बिग बॉस 9ची स्पर्धक मंदना करीमी सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक्टिव्ह असणारी मंदनाने इंस्टाग्रामला अलविदा केले आहे.

बिग बॉस 9ची स्पर्धक मंदना करीमी सध्या चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक्टिव्ह असणारी मंदनाने इंस्टाग्रामला अलविदा केले आहे. तिने हा निर्णय बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाल्यानंतर घेतला आहे.

मंदनाने नुकतेच टॉवेलमधील काही फोटो शेअर केले होते ज्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिने एक व्हिडिओ शेअर करत इंस्टाग्राम सोडत असल्याची माहिती दिली. तिने या गोष्टीचादेखील उल्लेख केला की लोक तिला का टारगेट करतात?

मंदना करीमीने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, एका शरीराहून जास्त एक सेक्सी मॉडेल किंवा अभिनेत्रीहून जास्त, एक सुंदर चेहऱ्याहून जास्त.. मी सोशल मीडियावर प्रामाणिक, ओपन आणि रियल राहिली आहे. नेहमी द्वेष करणाऱ्या लोकांकडे प्रेम आणि सहानुभूतीने पाहिले आहे. पण तुम्ही सगळ्यांनी मला फसविले आणि त्रास दिला. मला आणि माझ्यावर प्रेम असणाऱ्या लोकांना तुमच्या वाईट कमेंट्सचा खूप त्रास झाला. मला, माझ्या मित्रांना आणि कुटुंबाला स्टॉल्क केले.

एका मुलाखतीत मंदनाने सांगितले होते की, लोक तिला मुसलमान आणि ईराणी असल्यामुळे टारगेट करतात. मंदाना करीमी तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिला बिग बॉसच्या घरात पाहिले होते. यापूर्वी ती कित्येक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटात झळकली होती.

मंदनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती द कॅसिनो वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये तिच्यासोबत करणवीर बोहरा होता.

टॅग्स :इन्स्टाग्राम