Join us
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिका शेरावतचा लॉस अँजेलिसमध्ये आहे आलिशान बंगला, व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:01 IST

अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकतेच इंस्टाग्रामवर लॉस अँजेलिसमधील बंगल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे पण सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या बंगल्याची झलक पहायला मिळते आहे.

मल्लिका शेरावत लॉस अँजेलिसमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय करते आहे. नुकतेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जिथे तिचा व्हिलाची झलक पहायला मिळाली. व्हिडीओची सुरूवात होते एका मोठ्या दरवाजाने जिथून मल्लिका शेरावत बाहेर येताना दिसते आणि आपल्या कुत्र्यासोबत पूलकडे जाताना दिसते. पूलमध्ये गेल्यानंतर तिथे पाण्यात कुत्र्यासोबत खेळताना दिसते आहे.

या व्हिडीओत मल्लिकाचा व्हिला पाहून चाहते हैराण झाले आणि तिच्या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. मल्लिका या घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मल्लिकाने यापूर्वीही चाहत्यांना व्हिलामधील गार्डन आणि पूलाची झलक पहायला मिळते आहे.

२०१३ साली मल्लिकाने लॉस अँजेलिसमध्ये शिफ्ट झाल्याचे म्हटले होते. मल्लिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझा वेळ लॉस अँजेलिस, अमेरिका आणि भारतात डिवाइड केला आहे. तर आता मी अमेरिकेत जेव्हा सामाजिक स्वातंत्र्याचा अनुभव घेते आहे आणि जेव्हा भारतात परतले आणि तिथल्या महिलांप्रती लोकांचा विचार ऐकून मला वाईट वाटते.

मल्लिका शेरावते आपल्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनवरील जाहिरातीतून केले होते. त्यानंतर ती जीना सिर्फ मेरे लिएमधून छोट्या भूमिकेत दिसली होती.

याशिवाय तिने ख्वाहिश, मर्डर, प्यार के साइड इफेक्ट आणि वेलकममध्ये काम केले आहे.

टॅग्स :मल्लिका शेरावत