Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 11:10 IST

बेडरुममध्ये घुसायचा प्रयत्न केला, प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल बोलली मल्लिका शेरावत

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिला कायम बोल्ड अभिनेत्री म्हटलं जातं. 'मर्डर' सारख्या सिनेमात तिने दिलेले इंटिमेट सीन्स चांगलेच चर्चेत होते. मात्र पडद्यावर बोल्ड असलेली मल्लिका खऱ्या आयुष्यात कॉम्प्रमाईज करत नाही हे तिने स्पष्ट केलं. अनेकदा अभिनेत्यांनी तिच्याकडे विचित्र मागण्या केल्या मात्र तिने कायम नकार दिला. म्हणूनच तिला इंडस्ट्रीत नंतर सिनेमे मिळाले नाही असं ती सांगते. नुकतंच मल्लिकाने एका मुलाखतीत मल्टिस्टारर सिनेमात काम करताना आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.

एका जुन्या मुलाखतीत मल्लिका शेरावत म्हणाली, "मी दुबईत एक बिग बजेट सिनेमाचं शूट करत होते. हा मल्टिस्टारर सिनेमा होता. सिनेमा सुपरहिट झाला होता. लोकांना खूप आवडला  होता. मी त्यात कॉमेडी भूमिका साकारली होती. त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता माझा दरवाजा वाजवायचा. इतकं जोरात वाजवायचा की असं वाटायचं हा दरवाजा तोडेल. कारण त्याला माझ्या बेडरुममध्ये घुसायचं होतं. आणि मी सरळ नाही म्हणाले. हे होऊ शकत नाही. त्यानंतर त्या अभिनेत्याने कधीच माझ्यासोबत काम केलं नाही."

मल्लिकाच्या या मुलाखतीनंतर हा सिनेमा 'वेलकम'च आहे असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. कारण हा सुपरहिट कॉमेडी मल्टीस्टारर सिनेमा होता जो दुबईत शूट झाला होता. मल्लिकानेही यात कॉमेडी केली होती. तसंच या मुलाखतीत मल्लिकाने आणखी कास्टिंग काऊचचे तिला आलेले अनुभव सांगितले आहेत. 

मल्लिका बरेच दिवसांनी बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या 'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' मध्ये ती झळकणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी सिनेमा रिलीज होत आहे.

टॅग्स :मल्लिका शेरावतकास्टिंग काऊचबॉलिवूड