Join us  

मालदीव Vs लक्षद्वीप : व्हॅकेशनसाठी कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? 'कालीन भैय्या' म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 3:28 PM

'बायकॉट मालदीव' वादात दमदार अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही उडी घेतली.

पंतप्रधान मोदी यांचे लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं, यानंतर भारत विरुद्ध मालदीव यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं. आता हा वाद टोकाला पोहोचला आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्यांच्या टिप्पणीवर प्रसिद्ध सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे. आता 'बायकॉट मालदीव' वादात दमदार अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही उडी घेतली. 

नुकतेच  न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांना मालदीवला फिरण्यासाठी जाणार का, असा प्रश्न केला. यावर ते म्हणाले, 'मी मालदीवला का जाऊ, मी तर लक्षद्वीपला जाईन. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी मालदिवला लोक जातात. भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी मी कायमच बोलत आलो आहे. मी नेहमीच माझ्या मुलांना भारतात पर्यटन करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आपला देश पाहिल्यास फिरल्यास आयुष्य बदलू शकतं असे मी मुलांना सांगत असतो'

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅग ट्रेंन्ड करत आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटींनी, भारतीय पर्यटकांनी मालदीवच्या ट्रिप देखील रद्द केल्या आहेत आणि लक्षद्वीपला प्रमोट करायला सुरुवात केली. सेलिब्रेटींनी लक्षद्वीप, अंदमान आणि सिंधुदुर्ग सारख्या भारतीय समुद्री बेटांकडे वळण्याचे लोकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, मालदीवला मोठी चपराक भारतातील दिग्गजांनी दिली. त्यानंतर, मालदीव सरकार नरमलं असून त्यांनी अपप्रचाराबद्दल खेदही व्यक्त केला. 

टॅग्स :पंकज त्रिपाठीसेलिब्रिटीबॉलिवूडनरेंद्र मोदीमालदीवलक्षद्वीप