Join us  

महेश बाबू पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आला पुढे, सीएम रिलीफ फंडमध्ये जमा केली इतकी रक्कम!

By अमित इंगोले | Published: October 21, 2020 10:06 AM

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय सुपरस्टार महेश बाबूने पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय सुपरस्टार महेश बाबूने पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपला हात पुढे केला आहे. महेश बाबूने तेलंगना सीएम फंडमध्ये १ कोटी रूपयांची रक्कम जमा केली आहे. याची माहिती स्वत: महेश बाबू याने ट्विट करून दिली. तसेच त्याने पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी सर्वांनी समोर यावं असं आवाहनही केलं आहे. 

महेश बाबूने ट्विट करत लिहिले की, 'तेलंगानाच्या सीएम रिलीफ फंडसाठी मी १ कोटी रूपये दिले आहेत. माझी तुम्हा सर्वांनाही विनंती आहे की, समोर येऊन तुम्हीही मदत करावी. या कठिण काळात आपल्या लोकांसोबत उभे रहा'. याआधीही कोरोना महामारीदरम्यान महेश बाबूने आंध्र प्रदेश आणि तेलंगना सीएम रिलीफ फंडमध्ये १ कोटी रूपयांची मदत दिली होती. (महेश बाबूच्या सिनेमात झाली 'झक्कास' बॉलिवूड स्टारची एन्ट्री?, सिनेमा ब्लॉकबस्टर होण्याची चर्चा जोरात)

महेश बाबू म्हणाला की, 'मी सर्वांनी विनंती करतो की, जे लोक समोर येऊ शकतात त्यांनी दान करावं. या मदतीने बदल होईल'. दरम्यान महेश बाबूसोबतच साऊथमधील लोकप्रिय कलाकार अल्लु अर्जुन, पवन कल्याण, रजनीकांत यांनी सुद्धा सीएम रिलीफ फंडमध्ये रक्कम जमा केली आहे. (साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅन शाहरूखच्या व्हॅनपेक्षाही आहे महाग, किंमत वाचाल तर चक्रावून जाल...)

महेश बाबूच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर अभिनेता त्याच्या आगामी 'सरकरू वेरी पाटा' सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री किर्ति सुरेश दिसणार आहे. परशुराम या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. दरम्यान, साऊथमधील वेगवेगळ्या भागाला पुराचा तडाखा बसला आहे. अनेकांना बेघर व्हावं लागलं आहे. अशात लोकांना मदत करण्याचं ही आवाहन केलं जात आहे.  

टॅग्स :महेश बाबूTollywood