Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:05 IST

Shivali Parab : अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिवाली परबने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने नव्या घरात पूजा करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra Show)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या कार्यक्रमाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या शोमधून अनेक कलाकार घराघरात पोहचले. दरम्यान आता या कार्यक्रमातील कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) हिने अलिकडेच घर घेतल्याची खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केली होती. दरम्यान आता तिने तिच्या २९व्या वाढदिवसा दिवशी नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. अक्षय तृतियेच्या दिवशी तिने घरात पूजा करून गृहप्रवेश केला आहे, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर अभिनेत्री शिवाली परबने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. तिने नव्या घरात पूजा करतानाचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यात तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.

शिवाली परबने अलिकडेच मीडिया टॉल्क मराठी या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवीन घराबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, मी घर घेतले आहे. या नवीन घराची पूजा मी १० तारखेला ठेवलेली आहे. हे सर्व नक्कीच प्रेक्षकांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे. आता शिवालीच्या नव्या घराची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

वर्कफ्रंटशिवाली परबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तिला महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने या शोमध्ये येण्यापूर्वी अनेक नाटक आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ती हृदयात वाजे समथींग या मालिकेत काम केले आणि त्यानंतर तिने बँक बँचर वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा