Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हास्यजत्रा फेम' दत्तू मोरेचं हिंदीत पहिलं पाऊल! जाहिरातीत झळकला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 19:08 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टेलव्हिजन कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर दत्तू मोरे यानं हिंदी कलासृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टेलव्हिजन कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला हास्यवीर दत्तू मोरे यानं हिंदी कलासृष्टीत पहिलं पाऊल टाकलं आहे. हास्यजत्रेच्या स्किटमधून विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या दत्तूला एका हिंदी जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली आहे. नुकतंच त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या नव्या जाहिरातीतील लूक शेअर केला आहे. 

दत्तूनं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो एका कैद्याच्या गणवेशात दिसतोय. तर शिलाई मशीनवर तो काम करताना दिसतो आहे. आता ही जाहिरात पाहिल्यावरच दत्तूच्या भूमिकेची नेमकी माहिती सर्वांसमोर येईल. “माझी पहिली हिंदी जाहिरात. तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे”, असं कॅप्शन देत दत्तूनं आपल्या चाहत्यांना नव्या जाहिरातीची गूडन्यूज दिली आहे. 

चाळीला मिळालं होतं दत्तूचं नावदत्तूचा सन्मान म्हणून याआधी तो राहत असलेल्या चाळीला 'दत्तू मोरे चाळ' असं नाव देण्यात आलं होतं. दत्तू राहात असलेली चाळ ‘दत्तू चाळ’ म्हणून ओळखली जात आहे. दत्तू ठाण्यातील एका चाळीत लहानाचा मोठा झाला आहे. गेली अनेक वर्ष तो राहात असलेल्या चाळीला नाव नव्हतं. दत्तूच्या यशाचा सन्मान म्हणून त्याच्या चाळकऱ्यांनी चाळीला दत्तू मोरेचं नाव देण्याचं ठरवलं आणि योगही जुळून आला. आज दत्तू राहात असलेली चाळ दत्तू मोरे चाळ म्हणून ओळखली जाते. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा