Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षित खुश्श...! मोठा मुलगा झाला ग्रॅज्युएट; म्हणाली, ही अभिमानाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 19:58 IST

Madhuri Dixit : मुलाच्या यशाने माधुरी भारावून गेली आहे...; माधुरीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. सोबत कुटुंबाचा एक सुंदर फोटोही.

ठळक मुद्देमाधुरी आणि श्रीराम नेने यांची पहिली भेट अगदी योगायोगाने झाली होती; पण पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या जाम खुश आहे. कारणही तसेच खास आहे. होय, माधुरीचा लाडका लेक ग्रॅज्युएट झालाये.माधुरीचा मुलगा अरिन (Arin Nene) याला हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. माधुरीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. सोबत कुटुंबाचा एक सुंदर फोटोही.यात माधुरी, पती श्रीराम नेने (Shriram Nene) , मुलगा अरिन आमि लहान मुलगा रयान आहेत. ‘राम आणि माज्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अरिन हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. अभिनंदन अरिन आणि 2021चा संपूर्ण टीमचेही अभिनंदन. हे वर्ष सगळ्यांसाठीच अत्यंत कठीण होत पण तुमच्या मेहनतीला, चिकाटीला, जिद्दीला आमचा सलाम,’ असे तिने सोबत लिहिले आहे.प्रयत्न सोडू नका़ स्वप्नांची कास धरा़ एक दिवस तुमच्यामध्ये बदल घडवण्याची ताकद असेन, असे तिने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

माधुरीला मोठा मुलगा अरिन आता पुढच्या शिक्षणासाठी विदेशात जाणार आहे. अलीकडे माधुरीचा पती श्रीराम नेने याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले होते, शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम सुरू केल्याबद्दल त्याने आदित्य ठाकरे यांना धन्यवाद दिले होते.

 

 अशी झाली होती माधुरी-नेनेंची पहिली भेटमाधुरी आणि श्रीराम नेने यांची पहिली भेट अगदी योगायोगाने झाली होती; पण पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली. या दोघांची पहिली भेट लॉस एंजिल्स येथे माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये झाली. माधुरी सुपरस्टार होती; पण डॉ. नेने यांना याची काहीच कल्पना नव्हती. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करते, हे देखील त्यांना माहीत नव्हते. एकदा डॉ. नेने यांनी माधुरीला आपल्याबरोबर डोंगरावर बाइकवरून येण्यासंबंधी विचारले आणि माधुरीनं त्याला होकार दिला. पण बाईकवरून डोंगरावर जाणे फार कठीण होते़ मात्र इथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या अधिक जवळ आले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :माधुरी दिक्षित