Join us

खलनायक 2? सुभाष घईंमुळे माधुरी-संजय दत्त पुन्हा दिसले एकत्र, डॉ नेनेंनीच शेअर केला Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 10:31 IST

एका डिनर पार्टीत माधुरी दीक्षित, तिचे पती श्रीराम नेने, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनुपम खेर एकत्र आले.

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे आयकॉनिक ठरलेत. त्यात ९० च्या दशकातील अनेक सिनेमांचा समावेश आहे. आजही ते चित्रपट पाहिले जातात. त्यापैकीच एक म्हणजे 1993 साली आलेला 'खलनायक' (Khalnayak). या सिनेमामुळे संजय दत्त (Sanjay Dutt) आणि माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली होती. त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते प्रेमातच पडले होते. अर्थात खऱ्या आयुष्यात त्यांचं प्रेम यशस्वी झालं नाही.पण या जोडीची चर्चा नेहमीच होत असते. पुन्हा एकदा सुभाष घईंमुळेच ही जोडी परत एकत्र दिसली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

फिल्म निर्माता सुभाष घई आणि त्यांची पत्नी मुक्ता घई यांनी काल आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांनी मुंबईत डिनर पार्टीचे आयोजन केले होते.  यावेळी माधुरी दीक्षित, तिचे पती श्रीराम नेने, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनुपम खेर एकत्र आले. संजय दत्त आणि माधुरी दीक्षितला एकत्र पाहून चाहत्यांना तर विश्वासच बसला नाही. सर्वांनाच खलनायकची आठवण झाली. डॉ श्रीराम नेने यांनी हे फोटो शेअर करत लिहिले,'अशा लोकांमुळेच वेळ सुंदर जातो.'

'खलनायक' सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र चित्रपटाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.संजय दत्त आणि माधुरीला एकत्र बघून चाहते 'खलनायक 2' यायला हवा अशा प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले,'गंगा,राम आणि बल्लू एकत्र, खलनायक 2!'.  दरम्यान 'खलनायक 2' येणार अशा चर्चा मध्यंतरी जोर धरुन होत्या. मात्र अद्याप यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :माधुरी दिक्षितसंजय दत्तबॉलिवूड