Join us

Video : माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स पाहून भारावले डॉ. नेने; बायकोसाठी सगळ्यांसमोरच मारल्या शिट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 08:54 IST

आजवर अनेकांना नृत्याने मंत्रमुग्ध केलेल्या माधुरीने पतीलाही थक्क करून सोडलं. माधुरीचा डान्स पाहून डॉ. नेनेंनी सगळ्यांसमोरच पत्नीसाठी शिट्या मारल्या.

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवते. अभिनेत्रीबरोबरच ती एक उत्तम डान्सरही आहे. सध्या ती 'डान्स दिवाने' या डान्स रिएलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. माधुरी १५ मे रोजी तिचा ५७वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने खास माधुरी स्पेशल वीक या शोमध्ये सेलिब्रेट करण्यात आला. 

स्पर्धकांनी 'डान्स दिवाने'च्या मंचावर माधुरीच्या विविध गाण्यांवर परफॉर्म करत तिला सरप्राइज दिलं. या भागात माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेनेदेखील सहभागी झाले होते. बर्थडे स्पेशल वीकमध्ये चिमुकली दीपानिताने माधुरीच्या "बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल..." या गाण्यावर डान्स केला. चिमुकलीचा डान्स पाहून सगळेच भारावून गेले. दीपानिताने माधुरीलाही तिच्याबरोबर डान्स करण्यास भाग पाडलं. याचा व्हिडिओ कलर्सच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओत चिमुकल्या दीपानितासह माधुरीही डान्स करताना दिसत आहे. आजवर अनेकांना नृत्याने मंत्रमुग्ध केलेल्या माधुरीने पतीलाही थक्क करून सोडलं. माधुरीचा डान्स पाहून डॉ. नेनेंनी सगळ्यांसमोरच पत्नीसाठी शिट्या मारल्याचं व्हिडिओत दिसत आहे. माधुरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटी