Join us  

Video: २७ वर्षांनी एकत्र आल्या 'निशा' आणि 'पूजा', माधूरी-करिश्माने केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:54 AM

'दिल तो पागल है' मधील निशा आणि पूजा २७ वर्षांनी एकाच मंचावर. माधूरी - करिश्माचा अनोखा डान्स बघाच (dil to pagal hai, karisma kapoor, madhuri dixit)

१९९७ साली आलेला 'दिल तो पागल है' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमात शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांनी भूमिका साकारल्या. हा म्यूझिकल रोमँटिक सिनेमा चांगलाच गाजला. आजही या सिनेमातील डान्स आणि गाणी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या सिनेमातील निशा आणि पूजा म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूर आणि माधूरी दीक्षित यांनी २७ वर्षांनी पुन्हा एकदा 'दिल तो पागल है' मधील गाण्यावर जुगलबंदी केली. 

'डान्स दिवाने'च्या मंचावर माधूरी आणि करिश्मा एकत्र आल्या. यावेळी दोघींनीही 'दिल तो पागल है' गाण्यावर भन्नाट डान्स केला. या दोघींचा डान्स पाहून प्रेक्षकांना २७ वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं. 'दिल तो पागल है' मधील निशा आणि पूजा यांची इतकी वर्ष लोटली तरीही तीच एनर्जी पाहून प्रेक्षक थक्क होऊन गेले. 'डान्स दिवाने'च्या मंचावर असलेल्या सुनील शेट्टींनीही हा डान्स बघून चांगलीच दाद दिली.

करिश्मा कपूर आणि माधूरी दीक्षित सध्या चांगल्याच चर्चेत आहे. दोघीही मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. माधूरी सध्या 'भूल भूलेय्या 3' सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत असून विद्या बालन, माधुरी आणि तृप्ती डिमरी या अभिनेत्री या सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे करिश्मा अलीकडेच 'मर्डर मुबारक' या सिनेमात बघायला मिळाली.

टॅग्स :माधुरी दिक्षितकरिश्मा कपूरकार्तिक आर्यनविद्या बालनतृप्ती डिमरीभूल भुलैय्या