Join us  

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी LSD 2 चे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने मांडलं मत; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:15 PM

दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने दिवगंत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर भाष्य केले आहे.

दिबाकर बॅनर्जी हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता आणि जाहिरात-चित्रपट निर्माता आहेत, जे हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी हे सध्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'LSD 2' च्या प्रमोशनासाठी  विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं. 

दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. lत्यामुळे दिबाकर आणि सुशांत यांच्यात खास बॉन्डिंग होतं. नुकतेच सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत दिबाकर यांनी सुशांतचं कौतुक केलं. यासोबतच त्यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या आरोपांवर आणि त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर स्पष्टपणे मत मांडलं. 

ते म्हणाले, 'सुशांतच्या मृत्यूनंतर बातम्यांमध्ये बरेच काही चालू होतं. तेव्हा एक तरुण अभिनेता मरण पावला असं कोणीही म्हटलं नाही. अभिनयात टेलिव्हिजन ते चित्रपट असा सुशांतचा प्रवास कसा राहिला, यावर कोणीही बोललं नाही. सर्वांनी फक्त मसालेदार गॉसिपच केलं.  सुशांतला कोणी ड्रग्ज दिलं, त्याचा खून कोणी केला, या षडयंत्राचा अंदाज प्रत्येकजण लावत होता. पण, त्याच्यासाठी कोणी शोकसभा घेतली नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करून त्यावर चर्चा करायला हवी होती'.

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'लव्ह सेक्स और धोखा २' चित्रपट १९ एप्रिल, २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये इंटरनेटच्या युगातील प्रेम आणि नातेसंबंधांची झलक देणार आहे. ‘लव्ह, सेक्स अँड धोका’चा पहिला भाग २०१० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातून राजकुमार रावने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. आता १४ वर्षांनंतर ती पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. 'लव्ह सेक्स और धोखा २' बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि कल्ट मूव्हीज प्रस्तुत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडिया