Join us

Lokmat Most Stylish Awards 2019: अमेय वाघचा मोस्ट स्टायलिश डिजिटल पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 22:54 IST

अमेय वाघच्या डिजिटल माध्यमातील कामगिरीचा गौरव

एकदम वेगळ्या धाटणीचे, चाकोरीबाहेरचे, बोल्ड विषय आणि त्याचं तितकंच हटके सादरीकरण यामुळे वेब सीरीजनं तरुणाईला अक्षरशः 'याड' लावलं आहे. प्रत्येकाच्या खिशात असलेल्या या स्क्रीनवरून अमेय वाघनं चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या अमेयचा आज 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

अमेय वाघनेही डिजिटल माध्यमात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रंगभूमी आणि मराठी सिनेमा करत करतच तो या स्क्रीनकडे वळला आणि आता सेक्रेड गेम्स - २ मध्येही तो झळकतोय. भाडीपाच्या प्रयोगशील टीममध्ये अमेयही महत्त्वाचा शिलेदार आहे. त्याशिवाय, 'ब्रोचारा' ही त्याची वेब सीरीजही सध्या सुरू आहे.    डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या या अमेय वाघचा त्यानं दिलेल्या योगदानासाठी 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात गौरव करण्यात आला. 

टॅग्स :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डसअमेय वाघ