Join us  

लुलिया वंतुर झळकणार ‘या’ चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 9:18 AM

लुलिया 'राधा क्यो गोरी मै क्यो काला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

ठळक मुद्देलुलिया मॉडेल आणि रोमानियन अभिनेत्री आहेलुलिया वंतुर लवकरच बॉलिवू़डमध्ये करणार पदार्पण

 

सलमान खानची कथित प्रेयसी लुलिया वंतुर लवकरच बॉलिवू़डमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात लुलियासोबत जिम्मी शेरगीलही दिसणार आहे. ‘राधा क्यो गोरी मै क्यो काला’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

लुलियाने ट्विटरवर आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. प्रेम सोनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात एक सामाजिक संदेश दडला आहे, या प्रवासात आपल्या पाठीशी उभे राहण्याची विनंतीही तिने प्रेक्षकांना केली आहे.या सिनेमाबाबत लुलिया म्हणाली की, मी या चित्रपटात एका कृष्ण भक्ताची भूमिका साकारली आहे. ती गीतेचे अध्याय वाचते आणि भारताची संस्कृती व सभ्यता समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. भारतात तिच्यासोबत गैरवर्तुवणूक होते. मात्र तरीदेखील तिचा कृष्णाच्या भक्तीवरील विश्वास कायम असतो. अशी या सिनेमाची कथा आहे. तिने पुढे सांगितले की, मी भारतात आले तेव्हा मी ऋषिकेशला जाऊन आले आणि तिथे अधात्मचे दर्शन घेतले. 

सलमाननही ट्विट करत लुलीयाच्या सिनेमाचे पोस्टर शेअर करून तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लुलिया मॉडेल आणि रोमानियन अभिनेत्री आहे. याआधीही तिने काही कार्यक्रमात गाणीही गायली होती. त्यामुळे गायिका म्हणून तिची वेगळ ओळख बॉलिवूडमध्ये आहे. मात्र आता ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :युलिया वंतूरसलमान खान