Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाला हवा असा ‘लाइफ पार्टनर’!!

By admin | Updated: November 17, 2016 05:59 IST

चुलबुली, फनी, हॉट आणि बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिचा लाईफ पार्टनर व्हायला कोणत्या तरूणाला आवडणार नाही. पण,

चुलबुली, फनी, हॉट आणि बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिचा लाईफ पार्टनर व्हायला कोणत्या तरूणाला आवडणार नाही. पण, तिचा पार्टनर होणे इतके सोप्पं नाही. आपल्या लाइफ पार्टनरबद्दल आलियाच्या काही आगळ्यावेगळ्या अपेक्षा आहेत. होय, आलियाला लाइफ पार्टनर म्हणून कुणी ‘हॉट अ‍ॅण्ड हॅण्डसम’ व्यक्ती नकोय तर स्वभावाने एकदम ‘फनी अ‍ॅण्ड स्वीट’ असा सोबती हवा आहे. आलिया कुठल्याही कार्यक्रमादरम्यान ‘तू लग्न कधी करणार? लाइफ पार्टनरबद्दल तुझ्या अपेक्षा काय? ’ असे प्रश्न तिला हमखास विचारले जातात. या सततच्या प्रश्नांना आलिया कदाचित वैतागलीय. कारण आजपर्यंत ‘गोलमाल’ उत्तर देऊन आलिया हे प्रश्न टाळत होती. पण अलीकडे एका इव्हेंटला आलियाने याचे खरे खरे उत्तर देत सुटकेचा नि:श्वास सोडला. मला खूप देखणा वगैर नवरा नकोय. तो केवळ विनोदी स्वभावाचा असावा. त्याने मला खूप हसवावे आणि मी हसावे, इतकेच, असे आलिया म्हणाली. नुकत्याच लाँच झालेल्या ‘फिल्मफेअर’च्या कव्हर पेजवर आलिया भट्टचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळत आहे. तिचा हॉट अ‍ॅण्ड डॅझलिंग लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.