Sushmita Sen-Lalit Modi : अभिनेत्री सुष्मिता सेन ( Sushmita Sen ) ही सिनेमांपेक्षा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. अगदी काही महिन्यांआधीच सुष्मितानं बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केलं होतं. या ब्रेकअपचीही जोरदार चर्चा झाली होती. आता चर्चा आहे ती, सुष्मिताच्या आयुष्यातील नव्या पार्टनरची. होय, सुष्मिताच्या आयुष्यात बिझनेसमॅन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींची (Lalit Modi ) एन्ट्री झाली आहे.
काल गुरूवारी संध्याकाळी ललित मोदींनी एक ट्विट करत, सुष्मिताला डेट करत असल्याचं जगजाहिर केलं होतं. यानंतर सुष्मितापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या ललित मोदींसोबतचे तिचे रोमॅन्टिक फोटोही व्हायरल झाले होते. अद्याप सुष्मिता यावर काहीही बोललेली नाही. पण आता दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्यानंतर ललित मोदींचं एक जुनं ट्विट सुद्धा व्हायरल होतंय.
9 वर्षांपूर्वीचं ट्विट...
ललित मोदींचं हे ट्विट 9 वर्षांपूर्वीचं आहे. 2013 मध्ये ललित मोदींनी सुष्मिताला टॅग करत ट्विट केलं होतं. ‘ओके, मी कमिट करतो, तू खूप दयाळू आहेस... अर्थात वचनं तोडण्यासाठीच असतात... कमिटमेंट्स पूर्ण केल्या जातात... चीअर्स लव्ह, हिअर इज टू 47...,’ असं ट्विट ललित मोदींनी केलं होतं. सुष्मिताने त्यांच्या या ट्विटला स्मायलिंग इमोजीसह उत्तर दिलं होतं. gotcha 47 असं तिने लिहिलं होतं. यावर, ‘माझ्या एसएमएसला उत्तर दे,’ असं लिहिलं होतं.
2013 पासून सुरू आहे? असं एका युजरने लिहिलं आहे. ‘2013 पासून लॉन्ग टर्म रिलेशनशिप,’ अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. ‘9 वर्ष वाट पाहिली, आशा सोडायची नसते,’अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.आता खरं काय माहित नाही. सुष्मिता व ललित मोदींचं नातं किती जुनं आहे, याचं उत्तर तर फक्त कपलच देऊ शकतं...!