Tv Actress Swati Deval: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा कमालीची वाढला आहे. या मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत. या मालिकांच्या यादीत झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेचं नाव देखील अव्वल स्थानावर येतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आता प्रेक्षकांना आपलेच वाटू लागले आहेत. दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत मंगलाची भूमिका साकारणी अभिनेत्री स्वाती देवल (Swati Deval) सध्या चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अभिनेत्री स्वाती देवल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नुकतीच या अभिनेत्रीने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. "नवी सुरुवात, नवीन संधी, नवीन भूमिका नवीन नाव……लवकरच colors हिंदी वर “ मनपसंद की शादी……भेटुयात… चला भरभर congratulations म्हणा बरं... असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या या पोस्टला दिलं आहे. दरम्यान, स्वाती देवलची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींनी तिचं कौतुक करत शुभेच्छांवर वर्षाव केला आहे.
स्वाती देवलची ही पोस्ट पाहून आता ती 'लक्ष्मी निवास' मालिकेतून एक्झिट घेणार का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याबद्दलही अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत चाहत्यांच्या मनातील संभ्रम दूर केले आहेत. त्यामध्ये तिने लिहिलंय, "नवनवीन भूमिकांमधून मी तुम्हाला नेहमीच भेटायला येते. स्वराध्य झाल्यापासून मराठीत काम केलच नव्हतं. अनेक हिंदी मालिका करत गेले. आता पुन्हा त्या लिस्टमध्ये एका नवीन नावाची, भूमिकेची भर पडत आहे. लवकरच कलर्स हिंदी टेलिव्हिजनवरुन तुम्हाला भेटायला येत आहे. 'मनपसंद की शादी' या नव्या शोमधून."
'लक्ष्मी निवास' बद्दल म्हणाली...
त्यानंतर तिने लिहिलंय, "अतिशय गाजलेल्या आणि मोठ्या नावाजलेल्या प्रोडक्शनमधून म्हणजेच 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ है' सारख्या चित्रपटाचे निर्माते टीव्ही शो घेऊन भेटीस येत आहेत. ओळखा पाहू कोण? लवकरच तारीख कळवते... आणि हो लक्ष्मी निवास सारखी उत्तम मालिकाही मी करते आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना सोडून दूर जाणार नाहीच. तरी सर्वांनी या शोला भरभरुन प्रतिसाद द्या आणि असेच आशीर्वाद पाठिशी राहू द्या...".
वर्कफ्रंट
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून स्वाती देवल घराघरात पोहोचली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत मंगलाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.