Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेडी गागाला तिचे घर द्यायचंय भाड्याने, महिन्याचं भाडं वाचून येईल तुम्हालाही भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:50 IST

१३ महिन्यांच्या करारावर हे घर भाड्याने घेता येईल. लेडी गागा सध्या रोममध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

लेडी गागा जे काही करते त्याची चर्चा नाही झाली तरच नवल. फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात  असणारी लेडी गागा आलिशान आयुष्य जगते. ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब सारख्या नामांकित पुरस्कारांवर नाव कोरणारी लेडी गागा जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकांरांपैकी एक म्हणून ओळखली जाते. संगीताबरोबरच गेल्या काही काळात तिने अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीतही नाव कमावले.फॅशनेबल राहणीमानाचं सगळ्यांनाच आकर्षण असतं. अगदी तसेच लडी गागाचेही आहे.

नुकतेच तिचे तीन पाळीव कुत्रे चोरीला गेले होते. त्यातला एका कुत्र्याला शोधण्यात यश आले होते. तर दोन कुत्र्यांना शोधण्यासाठी लेडी गागाने चक्क कुत्र्यांना शोधून काढणा-याला 3.65 कोटींचे बक्षीस ठेवले होते.

बक्षीस जाहीर केल्यानंतर लेडी गागाला तिचे हरवलेले दोन्ही कुत्रे सापडले आणि शोधून काढणारा करोडपतीही झाला. पुन्हा एकदा लेडी गागा अशाच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आता तर लेडी गागाला  तिचे न्युयॉर्कमधले घर भाड्या तत्वावर द्यायचे आहे. त्यामुळे ती भाडेकरू शोधत आहे. मात्र या घराचे भाड्याची किंमत वाचून भोवळ नाही आली तरच नवल. दरमहा २ हजार डॉलर म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे १ लाख ४५ हजार ५१३ रुपये भाडं म्हणून द्यावं लागणार आहे. १३ महिन्यांच्या करारावर हे घर भाड्याने घेता येईल. लेडी गागा सध्या रोममध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

पॉप सिंगर लेडी गागाने पोस्ट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

लेडी गागाने ट्विटरवर एक संस्कृत श्लोक ट्विट केला होता. क्षणात लेडी गागाचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लेडी गागाचे हे ट्विट वाचून एकीकडे भारतीय चाहते आणि युजर्स सुखावले होते. तर दुसरीकडे जगातील इतर चाहते मात्र याचा अर्थ न समजल्याने गोंधळात पडले. संस्कृत न समजणा-या जगभरातील अनेक लोकांनी लेडी गागाच्या या ट्विटचा अर्थ शोधण्याचे प्रयत्न केले. खास करून भारतीय चाहत्यांनी लेडी गागाच्या या ट्विटचे विशेष कौतुक केले होते

टॅग्स :लेडी गागा