Join us

'किचन कल्लाकार' शोमध्ये येणार 'तुझ्यात जीव रंगला'मधील लाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:34 IST

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या लोकप्रिय कार्यक्रमातील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय कार्यक्रमातील लाडू म्हणजेच बालकलाकार राजवीर याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. लाडूला प्रेक्षक आजही विसरले नाही आहेत. आता हाच लाडू प्रेक्षकांना किचन कल्लाकारच्या किचनमध्ये दिसणार आहे. किचन कल्लाकारच्या आगामी भागात बच्चे कंपनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

किचन कल्लाकारच्या आगामी भागात लाडू सोबत अभिनेत्री स्नेहलता वसईकरची मुलगी शौर्या वसईकर आणि गायक राहुल देशपांडे याची मुलगी रेणुका देशपांडे देखील सहभागी होणार आहे. ही मुले कल्लाकारच्या किचनमध्ये खूपच कल्ला करताना दिसणार आहेत. लाडू म्हणजे छोटा पहेलवान आणि त्याला सामान मिळवण्यासाठी शेठ सोबत बैठका मारण्याची स्पर्धा करावी लागली. लाडू त्या स्पर्धेत शेठला मागे टाकतो. त्याचसोबत शौर्याला देखील सामान मिळवण्यासाठी अनेक कडू, गोड, आंबट रसांचा आस्वाद घ्यावा लागला. या बच्चेकंपनीने अजून काय काय धमाल केली आणि महाराजांसाठी काय पदार्थ बनवले हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका किचन कल्लाकारचा आगामी भाग रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

दरम्यान, किचन कल्लाकार या कार्यक्रमाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटींना काही भन्नाट पदार्थ तयार करायचा टास्क देतात.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगला