Join us

रूमर्ड बॉयफ्रेंडच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली क्रिती सनॉन, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:25 IST

अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

Kriti Sanon Wedding Rumours: अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon ) हिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. क्रिती सनॉन २०२५ मध्ये मध्ये रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये क्रिती तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसली. क्रिती ही रूमर्ड बॉयफ्रेंडच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेल्याची चर्चा आहे.  त्यामुळे लग्नाच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. 

 क्रिती आणि कबीर यांना अलीकडेच विमानतळावर एकत्र पाहिले गेलं. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्याबरोबर दिसणाऱ्या तरुणाला ती डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.  या व्हिडीओत दिसणारी क्रिती सेनॉन असून तिच्याबरोबर दिसणारा कबीर बहिया हा आहे. या व्हिडीओमध्ये तिनं चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दिसतंय. क्रिती आणि कबीर हे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत.  

क्रिती आणि कबीर हे प्रेमात असून दोघेही लग्न करणार आहेत. मात्र, या कथित जोडप्याने अद्याप या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रितीला नेहमीच आपलं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. त्यामुळे कदाचित तिने आतापर्यंत कबीरसोबतच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.  कबीर बहिया हा भारतीय क्रिकेटपटू एम. एस. धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षीचा (Sakshi Dhoni) चुलत भाऊ आहे. कबीर बहिया (Kabir Bahia) हा UK स्थित एक बिझनेसमन आहे. तो NRI कुटुंबातील आहे आणि Worldwide Aviation and Tourism Limited कंपनीचा संस्थापक असून करोडोंची कमाई करतो.

कबीरच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर, २०१९ च्या संडे टाइम्स रिच लिस्टनुसार, त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे ४६०० कोटी रुपये आहे.क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'तेरे इश्क में', 'हाऊसफुल ५' आणि 'भेडिया २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :क्रिती सनॉनबॉलिवूडसेलिब्रिटीदिल्ली