Join us

बॉलिवूडमध्ये नव्हतं करायचं या अभिनेत्रीला काम, लग्न करून थाटायचा होता संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:00 IST

बॉलिवूडची या अभिनेत्रीला थाटायचा होता संसार, मात्र आता ती बॉ़लिवूड व टॉलिवूडची आहे प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा सध्या आगामी चित्रपट हाऊसफुल ४, पागलपंती, चेहरे व तमीळ चित्रपट वानमध्ये बिझी आहे. तिचं म्हणणं आहे की तिला कधी अभिनेत्री बनायचं नव्हतं. 

आयएएनएसशी बोलताना क्रिती खरबंदाने सांगितलं की, मला कधी अभिनेत्री बनायचं नव्हतं. मला लग्न करायचं होतं आणि मुलं बाळ असा संसार थाटायचा होता. 

ती पुढे म्हणाली की, मी चित्रपटाची निवड भाषेनुसार करत नाही. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली तेव्हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये येण्याचा मार्ग मिळेल असा कधी विचार केला नव्हता. तसेच बॉलिवूड व टॉलिवूडमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. दोन्ही इंडस्ट्रीत समान काम मी करते.

क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर यापूर्वी तिने बॉलिवूड चित्रपट गेस्ट इन लंदन, शादी में जरूर आना, कारवां व यमला पगला दीवाना फिर सेमध्ये दिसली होती.

क्रितीला शादी में जरूर आना चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची कथा लव्हस्टोरीवर आधारीत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

क्रितीने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत गुगली, सुपर रंगा, ब्रुस लीःद फायटर यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. 

टॅग्स :कृति खरबंदाराजकुमार राव