Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा धर्मेंद्रच्या अशा वागण्यामुळे तनुजाने लगावली होती त्यांच्या कानशिलात, जाणून घ्या काय घडलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:36 IST

धर्मेंद्र आणि तनुजा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये 'चांद और सूरज', 'बहारे फिर आएगी', 'इज्जत' आणि 'दो चोर' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

उत्साह आणि आनंदाच्या भरात अनेकदा आपण जे नाही करायचं ते करतो. आपण स्वतःच्या आनंदात इतके मग्न असतो की आपण काय करतो आहे किंवा काय केले आहे याचे भानही आपल्याला नसतं. असंच काहीसं घडलं होतं बॉलीवुडचे हिमॅन म्हणजेच ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्यासोबत. धर्मेद्र केवळ चित्रपटांसाठीच नव्हे तर त्यांच्या रोमँटिक मूडसाठीही खूप प्रसिद्ध आहेत. धर्मेंद्रचा हाच मूड कधी काळी त्यांना महागातही पडला होता. जेव्हा त्यांनी थेट अभिनेत्री तनुजासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला.

धर्मेंद्र आणि तनुजा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये 'चांद और सूरज', 'बहारे फिर आएगी', 'इज्जत' आणि 'दो चोर' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तनुजा आणि धर्मेंद्र दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही होती. जितकी चांगली मैत्री तितकीच ऑनस्क्रीन त्यांची केमिस्ट्रीनेही रसिकांची पसंती मिळवली. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चांद और सूरज' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक किस्सा घडला होता. 

'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द तनुजाने याविषयी सांगितले होते. धर्मेंद्र अभिनयात येण्याआधीच विवाहीत होते. त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते आणि त्यावेळी त्यांचा मुलगा सनी देओल केवळ  5 वर्षांचा होता. धर्मेंद्रने मला त्याची पत्नी प्रकाशशी ओळख करून दिली होती. त्यामुळे प्रकाश कौरही चांगलीच परिचयाची झाली होती.

एक दिवस धर्मेंद्रने माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. धर्मेंद्रच्या अशा वागण्याने माझा संतापच अनावर झाला आणि काही विचार करणार तोपर्यंत धर्मेंद्रच्या कानशिलातच लगावली होती.  निर्लज्ज, मी तुझ्या पत्नीला ओळखते आणि तू माझ्याशी अशा प्रकारे फ्लर्ट करतोस. सेटवर जे काही घडले त्यावेळी माझा प्रचंड संताप झाला होता. धर्मेंद्र यांनाही लाजिरवाणे वाटले होते. धर्मेंद्रने लगेचच माझी माफी मागितली 'तनु, माझी आई, मला माफ कर. आजपासून मला तुझा भाऊच समज. ' लगेचच धर्मेंद्रच्या हातावर धागा बांधत भाऊ मानले होते.

धर्मेंद्र आणि तनुजा यांनीच एकत्र चित्रपटात काम केले आहे. असे नाही तर  त्यांच्या मुलांनीही एकत्र काम केले आहे. फक्त सनी देओलनेच काजोलसोबत कधीच काम केले नसले तरी बॉबी देओलने तनुजाची मुलगी तनिशासोबत 'टँगो चार्ली' चित्रपटात काम केले. या चित्रपटात बॉबी देओल आणि तनिषा किसींग सीनचीही प्रचंड चर्चा झाली होती.

टॅग्स :धमेंद्र