Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 3 Upadate: स्नेहा वाघला घरातून बाहेर काढण्याची होतेय मागणी, रसिकांचा होतोय संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 16:16 IST

स्नेहा वाघ सर्वांत चर्चेत राहणारी स्पर्धक आहे. शोमध्ये सहभागी होताच स्नेहा वाघची प्रचंड चर्चा झाली होती.

बिग बॉस मराठी ३ सध्या प्रचंड चर्चेत आहे. शोमुळे सहभागी झालेले स्पर्धकही तितकेच चर्चेत आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत. या सगळ्यांमध्ये स्नेहा वाघ सर्वांत चर्चेत राहणारी स्पर्धक आहे. शोमध्ये सहभागी होताच स्नेहा वाघची प्रचंड चर्चा झाली. यावेळी तिच्या करिअरमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यातल्या घडामोडींमुळे ती चर्चेत राहिली. घरात एंट्री करताच तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलत चर्चेत राहिली. शोमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी मेकर्सने स्नेहा वाघचा पूर्वाश्रमीच्या पती अविष्कार दारव्हेकरलाही शोमध्ये घेतले.  अविष्कार आणि स्नेहा दोघंही आमने-समाने असल्यामुळे चर्चा या होतच असतात. आता पुन्हा एकदा स्नेहा वाघ चर्चेत आहे. इतरवेळी सहानुभूती मिळवणारी स्नेहावर  यावेळी रसिक चांगलाच संताप व्यक्त करताना दिसत आहेत. इतकंच काय तर तिला शोमधून काढण्यात यावे अशीही मागणी होत आहे. 

स्नेहा वाघ चाहत्यांच्या निशाण्यावर येण्याचे कारण म्हणजे शोमध्ये सहभागी झाल्यापासून तिचा अनेकांशी वाद झाला आहे. इतकंच काय तर बिग बॉसकडून देण्यात आलेल्या टास्कही ती नीट पूर्ण करत नाही. ती कुठलेही नियम पाळत नाही.घरात स्नेहाचे वागणंच रटाळ असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. शोमध्ये स्नेहा वाघ असून नसल्यासारखीच आहे. कुठेच ती दिसत नाही. दिसते तेव्हा फक्त भांडणं करताना दिसते.कोणत्याच कामात ती फारशी एक्टीव्ह दिसत नाही. त्यामुळे स्नेहा वाघला सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच स्नेहा वाघ घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाली होती. मात्र अक्षय वाघमारेला घराबाहेर जावे लागले.

घरातले स्पर्धकांचे स्नेहा वाघसह चांगले ट्युनिंग नसल्याचे दिसते. घरातील सदस्य तिच्याविषयी अनेकदा बोलताना दिसतात. तर दुसरीकडे घरातल्या स्पर्धकांवर अजिबात विश्वास नसल्याचे स्नेहा बोलताना दिसते. स्नेहाचे आजपर्यंत मीरा जगन्नाथ, सुरेखा कुडची,आदिश वैद्य सोबत क्षुल्लक कारणांवरुन भांडणं झाली आहेत. फुटेज मिळते म्हणून कोणत्याही मुद्दावरुन भांडत राहणे हे समीकरण स्नेहाने वापरले असले तरी रसिकांना मात्र तिचं वागणं चांगलंच खटकत असल्याचे दिसतंय. 

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठी