1989 साली प्रदर्शित झालेला ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyaar Kiya) हा सिनेमा कोण बरे विसरेल. सलमान खान (Salman Khan) आणि भाग्यश्री (Bhagyashree) यांच्या जबरदस्त जुगलबंदीने सजलेला हा सिनेमा आणि त्याच्या आठवणी आजही सिनेप्रेमींच्या मनात ताज्या आहेत. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमातील प्रत्येक पात्र, प्रत्येक व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली. यापैकीच एक व्यक्तिरेखा होती दुधवाली गुलबियाची. अभिनेत्री हुमा खानने (Huma Khan) ही छोटीशी पण यादगार भूमिका साकारली होती. आता ही हुमा खान जवळजवळ बॉलिवूडमधून बाद झालीये.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मागे पुढे करणा-या गुलबियाला अगदी चित्रपटाच्या पोस्टरवही जागा मिळाली होती. आज आम्ही तिच्याच बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.‘मैनें प्यार किया’नंतर हुमा 1999 साली आलेल्या सलमानच्याच ‘हम साथ साथ है’ या चित्रपटातही दिसली होती. यात तिने आलोक नाथ यांच्या सेक्रेटरीची भूमिका साकारली होती. या दोन सिनेमानंतर हुमाला लोक ओळखू लागले होते. पण एक आरोप झाला आणि हुमाचे अख्खे करिअर संपले.
पाकिस्तानात जन्मलेली हुमार वयाच्या 17 व्या वर्षी आईसोबत मुंबईत आली होती. 1980 च्या सुरुवातीला तिने एका दोन मुलांच्या बापासोबत लग्न केले. अर्थात हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. हुमाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये सुमारे 20 सिनेमांत काम केले. पण तिच्या वाट्याला आले ते फक्त सहाय्यक अभिनेत्रीच्या रोल. याचमुळे हुमावर सी-ग्रेड व हॉरर सिनेमात काम करण्याची वेळ आली. खूनी रात, प्यार का देवता, कफन, खूनी मुर्दा, जानवर यासारख्या हॉरर सिनेमात ती दिसली.याचदरम्यान हुमावर एक गंभीर आरोप झाला आणि सगळे काही संपले.
हुमावर एका लहान मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि हा आरोप सिद्ध झाल्याने तिला शिक्षा देखील झाली होती.अभिनयक्षेत्रात चांगल्या भूमिका मिळत नसल्याने ती मुंबई सोडून पुण्याला राहायला गेली होती. पुण्याला जाताना ती तिच्या घरात काम करणा-या मोलकरणीच्या मुलीला सोबत घेऊन गेली होती. या मुलीकडून ती घरातील सगळी कामं करून घ्यायची. तसेच ती तिला मारहाण देखील करायची असा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. हुमाकडे ही मुलगी कित्येक महिने होती. त्या दरम्यान ती तिच्या आईला दर महिना 1500 रुपये पाठवत असे. ती करत असलेल्या मारहाणीमुळे तिच्यावर केस दाखल झाली आणि तिला तीन वर्षांची शिक्षा झाली होती. यानंतर हुमा बॉलिवूडमधून गायब झाली ती नेहमीसाठीच.