Join us

‘The Kashmir Files’मध्ये अनुपम खेर यांच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:48 IST

The Kashmir Files : तिने ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये शारदा पंडितची भूमिका साकारली आहे. शारदा पंडित या चित्रपटाचं महत्त्वपूर्ण पात्र आहे. तिला पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात. अख्ख्या सिनेमात तिच्या वाट्याला फार काही संवाद नाहीत. पण तिचा अभिनय अंगावर काटा आणतो....

‘द काश्मीर फाईल्स’  (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियापासून पब्लिक प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होतंय. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, पुनीत इस्सर, चिन्मय मांडलेकर असे अनेक कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत. या तगड्या स्टारकास्टमध्ये भाषा सुंबली  (Bhasha Sumbli) नावाच्या एका अभिनेत्रीचं नावही आवर्जुन घ्यावं लागेल. तिने ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये शारदा पंडितची (Sharda Pandit) भूमिका साकारली आहे.

शारदा पंडित या चित्रपटाचं महत्त्वपूर्ण पात्र आहे. तिने भोगवटा पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात. अख्ख्या सिनेमात तिच्या वाट्याला फार काही संवाद नाहीत. पण तिचा अभिनय अंगावर काटा आणतो. आज ही भाषा सुंबली नावाची अभिनेत्री कोण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भाषा सुंबलीचं मुळातच काश्मीरसोबत मोठ्ठ कनेक्शन आहे. ती मुळची काश्मीरची राहणारी आहे. तिचा जन्म काश्मीरातला. पण वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे प्रयागराज, जम्मू व दिल्लीच्या शरणार्थी शिबीरात तिचं बालपणं गेलं.

 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या भाषा सुंबलीने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. ‘एक था रस्टी’ हा तिचा पहिला शो. श्वेता तिवारीच्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, सबसे बडा कलाकार या शोचं दिग्दर्शन तिने केले. दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ या सिनेमाची अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणूनही तिनं काम पाहिलं. या चित्रपटात तिने विलनच्या बहिणीची छोटीशी भूमिका साकारली होती. पण तिला खरी ओळख मिळतेय ती ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेला सर्वांनीच दाद दिली आहे.हरियाणवी चित्रपटांचे दिग्गज अभिनेते दिवंगत ज्ञानचंद सोनी यांचा सर्वात लहान मुलगा सुनील सोनीसोबत भाषाचं लग्न झालंय.

टॅग्स :द काश्मीर फाइल्सअनुपम खेरबॉलिवूड