Join us
Daily Top 2Weekly Top 5

ती म्हणाली फुलं आवडतात, त्याने पाठवला ‘गुलाब’;‘अण्णा’च्या लेकीवर के. एल. राहुल फिदा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 13:39 IST

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी व क्रिकेटपटू के. एल. राहुल हे केवळ मित्र नाहीत, हे वेगळे सांगायची गरज नाही. ही मैत्री आताश: बरीच पुढे गेली आहे.

ठळक मुद्देअथिया शेट्टी हिने ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला.

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी व क्रिकेटपटू के. एल. राहुल हे केवळ मित्र नाहीत, हे वेगळे सांगायची गरज नाही. ही मैत्री आताश: बरीच पुढे गेली आहे. दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून हे दिसतेच. अथिया व राहुलच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. खरे तर अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नाही. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी न चुकता केले. दोघांचे एकत्र फोटो, एकत्र बाहेर फिरणे, एक दुस-यांचे फोटो शेअर करणे आणि त्यावर क्यूट कमेंट करणे यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. 

बुधवारी अथियाने एक पोस्ट शेअर केली आणि दुस-या सेकंदाला के. एल राहुलची कमेंट आली. होय, मला फुलं आनंद देतात, असे म्हणत अथियाने स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि राहुलने लगेच तिला ‘गुलाब’ पाठवून दिला. होय, अथियाच्या फोटोवर कमेंट करताना त्याने गुलाबाची इमोजी पाठवली. मग काय फॅन्सही क्रेजी झालेत.

नुकताच अथियाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाला के. एल. राहुलने शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली होती. अथियासोबतचा फोटो शेअर करत, ‘मॅड चाइल्ड’ असे राहुलने लिहिले होते. अथियानहीे केएल राहुलच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. हॅपी बर्थ डे माय पर्सन, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. 

अथिया शेट्टी हिने ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. 

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलसुनील शेट्टी