Join us

जीवाची मुंबई! अंबानींच्या लग्नसोहळ्यासाठी आलेल्या किम कार्दाशियनचा रिक्षातून प्रवास, शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 15:00 IST

मुंबई म्हटलं की रिक्षातून प्रवास आलाच. अगदी हॉलिवूड स्टार्सलाही रिक्षातून फिरण्याचा मोह आवरलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात एका लग्नसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंटसोबत आज लग्नबंधनात अडकत आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड स्टारही आले आहेत. इंटरनॅशनल फॅशन आयकॉन किम कर्दाशियन (Kim Kardashian) तिच्या बहिणीसह काल मुंबईत दाखल झाली. आज दोघी बहि‍णींनी मुंबईत रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई म्हटलं की रिक्षातून प्रवास आलाच. अगदी हॉलिवूड स्टार्सलाही रिक्षातून फिरण्याचा मोह आवरलेला नाही. अंबानींच्या विवाहसोहळ्यासाठी आलेल्या किम कर्दाशियन आणि क्लोई कार्दिशियन (Khloe Kardashian) यांनी रिक्षातून प्रवास करण्याच आनंद घेतला. दोघी बहिणी आपल्या टीमसोबत मुंबईतील ताज हॉटेलमध्ये राहत आहेत. भारतीय पद्धतीने काल त्यांचं हॉटेलमध्ये स्वागत करण्यात आलं. याचीही झलक त्यांनी दाखवली होती. आता किम कर्दाशियन समुद्रकिनारी रिक्षातून फिरताना दिसत आहेत. 

हॉलिवूड स्टार्सच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत चांगलीच चेष्टा केली आहे. 'रिक्षावाल्याची मुलाखत घ्या त्याला कसं वाटतंय?' अशी कमेंट एकाने केली आहे. आज तर रिक्षावाल्याला झोपच येणार नाही' अशीही कमेंट करत नेटकऱ्यांनी मजा घेतली आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन, माइक टायसन, जॉन सेना, निक जोनास हे हॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.  

टॅग्स :किम कार्देशियनअनंत अंबानीमुंबईसोशल मीडिया