Join us

खुल्लमखुल्ला पाठक बाईंनी राणादावर व्यक्त केलं प्रेम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 17:58 IST

Akshaya Deodhar, Hardeek Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधर एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात.

'तुझ्यात जीव रंगला' म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar) आणि हार्दिक जोशी (hardeek joshi). पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही जोडी सध्या सतत सोशल मीडियावर चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला असून त्यांच्या घरी लग्नाची गडबड सुरु झाली आहे. तसेच त्यांच्या केळवणालादेखील सुरूवात झाली आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा साखरपुडा पार पडल्यापासून ते दोघे सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करताना दिसतात. दरम्यान अभिनेत्री अक्षया देवधर हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हार्दिक जोशीवरील प्रेम व्यक्त केले आहे. अक्षयाने इंस्टाग्रामवर हार्दीक जोशीचा चालतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत ओ सनम..हे गाणं ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने आय लव्ह यू असं लिहिले आहे. अक्षयाच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. दोघांच्या केळवणालाही सुरूवात झाली आहे. पुण्यात त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. नुकतेच दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा लग्न कधी आणि कुठे करणार असा प्रश्न विचारल्यानंतर दोघेही पुण्यात लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला