Join us
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल दीपिकापेक्षाही हॉट दिसतात - रामगोपाल वर्मा

By admin | Updated: November 14, 2016 16:59 IST

वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विटसाठी सतत चर्चेत असणारे रामगोपाल वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विट केलेल्या एका मुळे चर्चेत आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विटसाठी सतत चर्चेत असणारे रामगोपाल वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विट केलेल्या एका मुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्मा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविषयी पुन्हा एकदा ट्विट करत वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी एक फोटो शेअर केला त्याला कॅप्शन दिले आहे. मला माहित नव्हते मफलरच्या पाठीमागे एवढा किलर लूक असेल. या फोटोत केजरीवाल दीपिका पदुकोण पेक्षाही हॉट दिसत आहेत असे उपहासात्मक ट्विट वर्मा यांनी केलं आहे . 
 
दरम्यान, यापुर्वी  अरविंद केजरीवाल यांनी 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावा मागीतल्यानंतर दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्माने खिल्ली उडवली होती. 'मफलर आणि टोपी घालून केजरीवाल एखाद्या माकडाप्रमाणे दिसतात, असे मला वाटायचे, मात्र लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यावरुन ते खरोखरच माकड असल्याचे सिद्ध झाले आहे', अशी उपहासात्मक टीका वर्माने केली होती. ट्विटरवर त्यांनी ही टीका केली आहे. तसंच 'केजरीवाल हनुमान आणि सुग्रीवच्या जातीपलीकडे जाऊन आता शरीफ-मुशर्रफ यांच्या जातीत पोहोचले आहेत, हे  त्यांनी लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नचिन्हावरुन सिद्ध झाले आहे', असे देखील ते म्हणाले होते.