Join us  

लगीन घाई,विकी कौशल आणि कतरिना कैफ अडकणार लग्नाच्या बेडीत,जाणून घ्या संपूर्ण प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 11:58 AM

.'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये खुद्द कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचं म्हटलं होते.

गेल्या काही दिसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. दोघांनी आजपर्यंत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिलेली नाही. मात्र मध्यंतरी दोघांचाही साखरपुडा झाल्याचे समोर आले होते. यावरही दोघांकडून कोणतीच प्रतिक्रीया आली नव्हती. विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली होती. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या साखरपुड्याच्या वृत्ताला कुटुंबियांनी नकार दिला होता. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटलं होते.

आता थेट त्यांच्या लग्नाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. दोघंही  पुन्हा  एकमेकांसोबत दिसले. त्यामुळं लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याचंही समजतंय. या वर्षाअखेरी लग्नाच्या बेडीत अडकणार अशा सध्या चर्चा आहेत.दोघेही एकत्र दिसल्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. दोघांनीही लग्न करावे अशी ईच्छा चाहते त्यांच्या फोटोवर व्यक्त करताना दिसतात.

गेल्या वर्षभरापासून दोघांचे अफेअर असल्याचे म्हटलं जाते.'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये खुद्द कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत रुपेरी पडद्यावर चांगली दिसणार असल्याचं म्हटलं होते. कतरिनाने विकी कौशलचे केलेले कौतुक पाहून चाहते तर्क वितर्क लावत होते. इतकेच काय तर, कतरिना कैफ 'टायगर 3' च्या शूटसाठी जाण्यापूर्वीच रोका सेरेमनीच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र कतरिनाच्या टीमने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार दोघांच्या कुटुंबानी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली आहे. लग्नासाठी कतरिनाचा लेहंगा खास सब्यसाची डिझाइन करत आहेत. लग्नात कतरिनाचा लेहंगा कसा असावा यावर सध्या काम सुरु आहे. नोव्हेंबर -़ डिसेंबरमध्ये ह कपल लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. आता खरं काय आणि खोटं काय हे तर विकी आणि कतरिनाच सांगू शकतात.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल