Join us

‘कसौटी जिंदगी के’ फेम अभिनेता पार्थ समथानला झाला कोरोना; शूटिंग झाले ‘स्टॉप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 17:51 IST

‘कसौटी जिंदगी के’ फेम अभिनेता पार्थ समथान हा देखील पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय. याशिवाय पार्थच्या ‘पवित्र भाग्य’ या मालिकेची शूटिंगही काही दिवसांसाठी थांबल्याचे सुत्रांकडून कळतेय.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजलेला आहे. भारतात लॉकडाऊन सुरू आहे. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. छोटया पडद्याच्या चाहत्यांसाठी आता अजुन एक बातमी येत आहे. ‘कसौटी जिंदगी के’ फेम अभिनेता पार्थ समथान हा देखील पॉझिटिव्ह असल्याचे समजतेय. याशिवाय पार्थच्या ‘पवित्र भाग्य’ या मालिकेची शूटिंगही काही दिवसांसाठी थांबल्याचे सुत्रांकडून कळतेय. या दोन्ही मालिकांची शूटिंग मशहूर स्टुडिओ क्लिक निक्सन येथे सुरू होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मालिकांचे  क्रू आणि कलाकारांना कोरोना टेस्टिंगसाठी पाठवले गेले होते. त्यानंतर स्टुडीओ सील करण्यात आला होता. काही दिवसांपासून पार्थला अस्वस्थ वाटत असल्याने त्याने कोरोना टेस्ट करून घेतली तर तो पॉझिटिव्ह आला. मागील आठवड्यातच त्याने शूटिंगला सुरूवात केली होती. त्याच्यासोबत एरिका फर्नांडिस, करण पटेल, पुका बॅनर्जी, शुभवी चौकशी हे सहकलाकार शूटिंग करत होते. 

याच स्टुडिओमध्ये ‘कसोटी जिंदगी के’ आणि ‘पवित्र भाग्य’ शिवाय ‘नागिन’,‘कुंडली भाग्य’,‘कुमकुम भाग्य’ यांसारखे शोजची शूटिंग सुरू झाली होती. बालाजी टेलिफिल्म्सच्या सर्व मालिकांच्या शूटिंगला थांबवण्यात आल्याचे कळतेय. 

टॅग्स :टेलिव्हिजनकसौटी जिंदगी की 2