Join us

Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 18:03 IST

अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या भागात फिरून भाजपा विरोधात प्रचार केला होतो. आणि विश्वास व्यक्त केला होतो की, कर्नाटकमधील जनता भाजपाला सरकार बनवू देणार नाही.

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि भाजपाने कॉंग्रेस तसेच जेडीएस यांच्यापेक्षा जास्त जागा मिळवल्यावर सोशल मीडियातून अभिनेता प्रकाश राज यांची खिल्ली उडवली जात आहे. 

अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या भागात फिरून भाजपा विरोधात प्रचार केला होतो. आणि विश्वास व्यक्त केला होतो की, कर्नाटकमधील जनता भाजपाला सरकार बनवू देणार नाही. प्रकाश राज यांनी पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण लावून धरलं होतं. 

 

 

 

 

भाजपाला कर्नाटकात भाजपाला मिळालेल्या जागांवर सोशल मीडियात काही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण त्यांचे वेगवेगळे फोटो घेऊन त्यांच्यावर जोक्स तयार केले जात आहेत. 

टॅग्स :कर्नाटक निवडणूक निकाल २०१८प्रकाश राज