Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिश्मा तन्नाला लागला जॅकपॉट, आता ‘सिम्बा’सोबत जमणार जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 16:23 IST

 ‘नागीन’ आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना सध्या चर्चेत आहे. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. 

 ‘नागीन’ आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना सध्या चर्चेत आहे. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. अगदी अलीकडे रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात करिश्माची भूमिका अगदीचं छोटी होती. पण त्यातही तिने आपली छाप सोडली होती. रणबीरनंतर करिश्मा तन्ना आणखी एका सुपरस्टारसोबत दिसणार आहे आणि हा सुपरस्टार दुसरा कुणी नाही तर रणवीर सिंग आहे. होय, ‘सिम्बा’स्टार रणवीर सिंग. करिश्मा रणवीरसोबत ‘चिंग्स चायनीज’च्या नव्या जाहिरातीत दिसणार आहे. 

तुम्हाला ठाऊक असेलचं की रणवीर या कंपनीचा ब्रांड अ‍ॅम्बीसीडर आहे. ‘चिंग्स चायनीज’च्या अनेक जाहिरातीत रणवीर दिसला आहे. नव्या जाहिरातीत तो करिश्मासोबत दिसेल. खुद्द करिश्माने रणवीरसोबतचा एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. अर्थात नंतर तिने हा फोटो आपल्या पेजवरून हटवला. आता याचे कारण तर आम्हाला ठाऊक नाही. पण करिश्मा सध्या जोरात आहे, हे मात्र आम्हाला चांगलेच ठाऊक आहे.‘संजू’चित्रपटात करिश्माने विकी कौशलच्या गर्लफेन्डची भूमिका साकारली आहे. ‘संजू’ रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे ‘मुझे चांद पे ले चलो’ हे गाणे रिलीज झाले होते. यात रणबीर कपूर आणि करिश्मा तन्ना हे दोघे दिसले होते.

 

टॅग्स :रणवीर सिंग