Join us

Hotness Overloaded! करिश्मा तन्ना झाली बोल्ड; बिकिनीमध्ये केले हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 10:03 IST

फोटो पाहून चाहते खल्लास...

ठळक मुद्दे‘नागीन’आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले.

‘संजू’ची अभिनेत्री करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जरा जास्तच अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसतेय. इन्स्टाग्रामवर स्वत:चे एकापाठोपाठ एक असे अनेक हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला आहे. सध्या तिच्या रेड बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तमन्नाने हे रेड बिकिनी फोटो शेअर केलेत आणि काही तासांत ते व्हायरल झालेत. सध्या तमन्ना मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याचठिकाणचे हे फोटो आहेत.

‘नागीन’आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना हे नाव लोकप्रिय झाले. यानंतर रणबीर कपूरच्या ‘संजू’मध्ये तिला संधी मिळाली. 

या चित्रपटात करिश्माने विकी कौशलच्या गर्लफेन्डची भूमिका साकारली आहे. ‘संजू’ रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे ‘मुझे चांद पे ले चलो’ हे गाणे रिलीज झाले होते.

यात रणबीर कपूर आणि करिश्मा तन्ना हे दोघे दिसले होते.  या चित्रपटात करिश्माची भूमिका अगदीचं छोटी होती. पण त्यातही तिने आपली छाप सोडली होती. रणबीरनंतर करिश्मा रणवीरसोबत ‘चिंग्स चायनीज’च्या नव्या जाहिरातीत झळकली.

करिश्मा तन्नाने आजवर ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’, ‘कही तो मिलेंगे’,‘देस में निकला होगा चाँद’, ‘शरारत’, ‘कुसूम’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

‘कयामत की रात’मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडली होती. सध्या मात्र ती बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. पाहा, तर करिश्माचा बोल्ड अंदाज...

टॅग्स :करिश्मा तन्ना