Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सीता'च्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या करीना कपूरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 16:25 IST

करीना कपूर सीतेच्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तिने या भूमिकेसाठी १२ कोटींची मागणी केल्याचे वृत्त होते.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर रामायणवर बनणाऱ्या चित्रपटात सीताची भूमिका करणार आहे. असे वृत्त समोर आले होते की, करीनाने या भूमिकेसाठी आपल्या मानधनात वाढ केली होती. तिने या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मागितले आहेत. त्यानंतर करीनाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. आता करीनाने या प्रकरणी मौन सोडले आहे.

नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरला या भूमिकेला घेऊन प्रश्न विचारण्यात आला की, तू सीतेच्या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन मागितले आहे तर त्यावर करीनाने त्यावर जास्त काही न बोलतो फक्त म्हटले हो.  आता करीनाचे हे उत्तर ऐकून असेच वाटत आहे की ती ही भूमिका करत नाही.

एकीकडे सोशल मीडियावर या गोष्टीवरून करीनाला खूप वाईटरित्या ट्रोल करण्यात आले होते. तर दुसरीकडे काही बॉलिवूड अभिनेत्रींनी तिच्या या प्रकरणी समर्थन केले. तापसी म्हणाली की, तुम्ही नेहमी महिलांवर प्रश्न करता. करीना देशातील सर्वात मोठी महिला सुपरस्टारपैकी एक आहे आणि जर ती तिच्या कामासाठी जास्त मानधन मागत असेल तर त्यात काय चुकीचे आहे. ती पुढे असेही म्हणाली की, जर पुरूष कलाकार अशा चित्रपटात काम करतो तर तो काही फ्रीमध्ये काम करत नाही.

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्री प्रियामणि म्हणाली की, जर कोणी महिलेला विचारत आहे की तिला काय हवंय तर तिचा तो हक्क आहे. तिच्यानुसार, करीना जे मागत आहे तो तिचा हक्क आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण त्याच्या लायक आहोत तर विशिष्ट किंमत मागणे काही चुकीचे नाही.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लाल सिंग चड्ढामध्ये आमिर खानसोबत दिसणार आहे. याशिवाय ती करण जोहरच्या तख्तमध्येही दिसणार आहे.

टॅग्स :करिना कपूरतापसी पन्नू