Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्यावर परिणाम झाला होता...', तैमुर नावावरुन झालेल्या ट्रोलिंगवर करीना कपूरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:39 IST

करीनाला आठवली आजोबांनी सांगितलेली एक शिकवण, म्हणाली...

करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर (Taimur) जन्मत:च प्रसिद्धीझोतात आला. गोरा रंग, निळे डोळे यामुळे त्याच्यात 'कपूर्स'ची झलक स्पष्ट दिसत होती. मात्र त्याचं नाव तैमुर ठेवलं गेलं आणि चांगलाच गदारोळ झाला. सैफ अली खानने हे मुघलांचं नाव मुलासाठी ठेवल्याने अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. तेव्हा याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला यावर नुकतंच करीना कपूरने भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत करीना म्हणाली, "माझे आजोबा नेहमी सांगायचे की कोणी जर तुमच्याबद्दल काही बोलत असेल मग ते चांगलं असो किंवा वाईट लक्षात ठेवा ते तुमच्याचबद्दल बोलत आहेत. कारण तुम्ही कोणीतरी आहात. नाहीतर कोणी तुमच्याबद्दल का बोलेल? तुम्हाला जर सुपरस्टार व्हायचंय तर मग कोणी काहीही बोलेल ऐका. यासाठी तुमचं मन दगडाचं हवं नाहीतर ही जागा तुमच्यासाठी नाही. 

नक्कीच माझ्यावर याचा परिणाम झाला जेव्हा लोकांनी तैमुरच्या नावावरुन बोलायला सुरुवात केली. तैमुरला तर माहितही नसेल की तेव्हा काय ड्रामा झाला होता. पण तितकंच तैमुरला सगळ्यांनी प्रेमही दिलं. लोकांना त्याच्यात खूप इंटरेस्ट होता. मला कळायचं नाही कारण तुम्ही त्याला ओळखत नाही तो इतका लहान आहे मग का? आता त्याला हळूहळू समजत आहे की का त्याच्यामागे एवढे पापाराझी असतात. पण मी त्याला नेहमी हे लक्षात आणून देते की तुला तुझ्या आईवडिलांमुळे ही प्रसिद्धी मिळत आहे. तसंच आपण शांत असणं गरजेचं आहे हे सैफने समजावलं. आम्ही त्यावर चर्चा केली. 

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूडतैमुर