Join us  

करण जोहर ते हृतिक रोशन! अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याकडे 'या' सेलिब्रिटींनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 5:54 PM

अंबानींच्या प्री वेडिंगमधून 'हे' सेलिब्रिटी गायब

गुजरातच्या जामनगरमध्येअनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचा (Radhika Merchant) प्री वेडिंग सोहळा उत्साहात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. उद्योगपती, हॉलिवूड स्टार, बॉलिवूड सेलिब्रिटी अशा सर्वांनीच सोहळ्याची शोभा वाढवली. अंबानींनी सोहळ्यासाठी अमाप खर्च करत पाहुण्यांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या. दरम्यान अंबानींच्या पार्टीत कोण कोण आलं नाही याचीही यादी मोठी आहे. जिथे अख्खं बॉलिवूडजामनगरमध्ये असताना काही सेलिब्रिटींनी मात्र सोहळ्याकडे पाठ फिरवली.

देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लेकाच्या प्री वेडिंगसाठी जवळपास सर्वांनाच आमंत्रण दिलं होतं. शाहरुख, सलमान, आमिर, सैफ, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, बच्चन फॅमिली, कपूर फॅमिली, स्टार कीड्ससह अनेक कलाकारांची मांदियाळी होती. तर काल शेवटच्या दिवशी गायक गायिकांचे लाईव्ह परफॉर्मन्स होते. दरम्यान या सोहळ्यासाठी कोणते सेलिब्रिटी पोहोचू शकले नाहीत आणि त्याचं कारण काय हे समोर आलं आहे.

हँडसम अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) प्री वेडिंगमध्ये दिसला नाही. काही दिवसांपूर्वीच त्याने कुबड्यांच्या आधारे उभा असलेला फोटो शेअर केला होता. सध्या तो मोठ्या त्रासाला सामोरा जात असल्याचं सांगितलं होतं. निर्माता करण जोहर (Karan Johar) त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे प्री वेडिंगला जाऊ शकला नाही. तर प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra) भारतात या सोहळ्यासाठी भारतात येऊ शकत नव्हती. मात्र तिची आई मधू चोप्रा यांनी सोहळ्याला हजेरी लावली.

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे कपलही अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याचा भाग नव्हते. अनुष्काने काही दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला असून कोहली कुटुंब सध्या लंडनमध्येच आहे. एकीकडे अजय देवगणने लेकीसह सोहळ्याला हजेरी लावली मात्र काजोल (Kajol) यावेळी गायब होती. तिच्या गैरहजेरीचं कारण मात्र समोर आलेलं नाही. शिवाय देओल (Deol) फॅमिली, शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), कंगना रणौत (Kangana Ranaut), मलायका अरोरा (Malaika Arora) हे सेलिब्रिटीही या ग्रँड सोहळ्यातून गायब होते. 

टॅग्स :अनंत अंबानीमुकेश अंबानीबॉलिवूडकाजोलहृतिक रोशनकरण जोहरजामनगर