Join us
Daily Top 2Weekly Top 5

मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 10:14 IST

मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कॉमेडिअन कृष्णा अभिषेकच्या आयुष्यात सगळं काही ऑल इज वेल सुरू नाही. जेव्हापासून कपिल शर्माच्या सेटवर गोविंदा आला होता तेव्हापासून कृष्णाबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. मामा-भाच्याचं नातं गेल्या काही दिवसांपासून चांगलं सुरू नाही. अशात जेव्हा या एपिसोडमध्ये काम न करण्याचा निर्णय कृष्णाने घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले होते. आता कृष्णाने स्वत:वर यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कृष्णाने सांगितले की, त्याचं गोविंदावर खूप प्रेम आहे. पण जर तो त्या एपिसोडचा भाग झाला असता तर स्वत:चे अश्रू रोखू शकला नसता. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला की, माझं गोविंदा मामावर खूप प्रेम आहे. त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर नाराज असण्याचा अधिकार आहे. माझं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की, जर ते समोर आले असते तर मी अश्रू रोखू शकलो नसतो. अशात त्या एपिसोडपासून दूर राहणंच योग्य होतं. तसेच कृष्णाने हेही मान्य केलं आहे की, काही दिवसांपासून त्याच्यात आणि गोविंदामध्ये अंतर वाढलंय. प्रेम आहेच पण तणावही आहे.

याआधीही कृष्णा या वादावर प्रतिक्रिया देत म्हणाला होता की, त्याला गोविंदासमोर परफॉर्म करण्यास अडचण आहे. त्याच्यानुसार, गेल्यावर्षीपर्यंत सुनीता मामीला तो असण्याची समस्या होती. यावर्षी आता त्याला समस्या आहे. कृष्णाच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट आहे की, गोविंदा आणि त्याच्यात सगळं काही ठीक नाही. आता तर स्थिती ही आहे की, दोघांनाही एकमेकांचा चेहरा बघायचा नाही.

दरम्यान, ज्या एपिसोडमध्ये कृष्णाने काम न करण्याचा निर्णय घेतला होता त्या एपिसोडमध्ये गोविंदाची जबरदस्त मस्ती बघायला मिळणार आहे. शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कपिल आणि गोविंदा एकमेकांची गंमत करताना दिसत आहेत. 

टॅग्स :कृष्णा अभिषेकगोविंदाकपिल शर्मा