Join us  

5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही 'कपिल शर्मा शो'च्या 'बच्चा यादव'चं घर; पाहा किकू शारदाच्या स्वप्नांचा इमला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 12:40 PM

Kiku sharda house: अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारा कुकू शारदा खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा आणि नम्र स्वभावाचा आहे.

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ठरलेला कॉमेडी शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' (The Kapil SharmaShow). या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे कुकू शारदा (Kiku Sharda). या शोमध्ये कुकू शारदाने 'बच्चा यादव' (Bachcha Yadav) ही भूमिका साकारली आहे.  उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारा कुकू शारदा खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा आणि नम्र स्वभावाचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या नावाची कायमच चर्चा होत असते. म्हणूनच, आपल्या अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किकू शारदाचं घर कसं आहे ते आज पाहुयात.

अनेक कार्यक्रमांमध्ये केलंय किकू शारदाने काम

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमापूर्वी किकूने अनेक गाजलेल्या मालिका, कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. 'हातिम', ‘F.I.R.’, 'अकबर बीरबल' अशा अनेक मालिकांमध्ये तो झळकला आहे.

The Kapil Sharma show फेम अभिनेत्याने विष खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांमुळे वाचले प्राण

 

पाहा किकू शारदाच्या घराची झलक

किकू शारदा त्याच्या कुटुंबासह मुंबईमध्येच स्थित आहे. हे त्याचं ड्रीम हाऊस असल्याचं म्हटलं जातं. किकू शारदा आणि त्याची पत्नी अनेकदा त्यांच्या घराचे काही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. यात त्याच्या पत्नीने घरातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या घरातील ड्रॅाइंग रुम दिसून येत आहे. किकूच्या घरातील प्रत्येत कोपरा विचारपूर्वक सजवण्यात आला आहे.  

टॅग्स :किकू शारदाद कपिल शर्मा शोसेलिब्रिटीटेलिव्हिजन