Join us

VIDEO : कपिल शर्माने नशेत असताना पत्नी गिन्नीला केलं होतं प्रपोज, त्यानेच केला खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 13:35 IST

कपिल शर्माने त्याची पत्नी गिन्नीला प्रपोज कसं प्रपोज केलं होतं याचा खुलासा कपिलने एका शोमध्ये केला आहे.

कपिल शर्मा (Kapil Sharma) लवकरच नेटफ्लिक्सवर धमाका करणार आहे. कपिलचा नेटफ्लिक्स स्पेशन I m Not Done Yet काही दिवसात येणार आहे. आता या कॉमेडी स्पेशलची आणखी एक क्लिप समोर आली आहे. या व्हिडीओत कपिलने त्याची पत्नी गिन्नी चतरथल प्रपोज कसा केला होता याबाबत सांगितलं.

कपिल गिन्नीबाबत म्हणाला की, 'ही सर्व अभिनेत्रींपैकी माझी सर्वात फेवरेट होती. आम्ही सोबत थिएटर करत होतो. मी अनेक गोष्टींसाठी तिची ड्युटी लावायचो. ती मला फोन करून सांगत होती की, आज हे केलं, ते केलं. आज आम्ही इतकी रिहर्सल केली. एक दिवस तिने मला फोन केला आणि त्या दिवशी मी दारू पिऊन होतो. मी उलचताच तिला विचारलं की, तुझं माझ्यावर प्रेम आहे? ती घाबरली की याने काय विचारलं? या व्यक्तीत इतकी हिंमत कुठून आली? मी देवाचे आभार मानतो त्या दिवशी मी ताडी पिऊन नव्हतो. नाही तर मी तिला विचारलं असतं की, गिन्नी तुझ्या वडिलांना ड्रायव्हर हवाय का?'.

गिन्नीने कपिलची घेतली फिरकी

कपिल शर्माने गिन्नीला प्रश्न विचारला, तो म्हणाला की, 'मला गिन्नीला एक विचारायचं आहे. ती तशी माझ्या शोमध्ये कधी आली नाही. गिन्नी तू फार चांगल्या घरातील आहे, फायनॅन्शिअली चांगल्या घरातून आहेस. एका स्कूटरवाल्या मुलासोबत काय विचार करून प्रेम केलं होतं? यावर गिन्नी म्हणाली की, 'काही नाही, मी विचार केला की, पैशेवाल्यांसोबत तर सगळेच प्रेम करतात. या गरीबाचं भलं करू'. 

टॅग्स :कपिल शर्मा नेटफ्लिक्स