Join us

अभिनेत्रीने सिनेमात दिलेले इंटिमेट सीन्स, आईवडील संतापून म्हणालेले, "अशी मुलगी नको..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:37 IST

बोल्ड सीन्समुळे अभिनेत्रीला आईवडिलांनीच नाकारलं

सिनेमांमध्ये अनेकदा बोल्ड, इंटिमेट दृश्यांचा समावेश असतो. अनेक कलाकाराचे हे सीन्स चर्चेत असतात. आजकाल तर सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटरही असतात. अभिनेत्रींना मर्यादा ओलांडली म्हणत त्यांना ट्रोलही केलं जातं. एक अशी अभिनेत्री आहे जिने बोल्ड सीन दिल्यानंतर तिच्या आईवडिलांनी 'आम्हाला अशी मुलगी नको' अशी प्रतिक्रिया दिली होती. कोण आहे ही अभिनेत्री?

२०१९ साली आलेल्या 'आय लव्ह यू' या कन्नड सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आहे रचिता राम (Rachita Ram). या सिनेमात तिने अभिनेता उपेंद्रसोबत इंटिमेट सीन केले होते. यामध्ये रचिताने धर्मिका ही भूमिका साकारली होती. सिनेमाच्या रिलीजनंतर अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं होतं. सिनेमात बोल्ड सीन देणं तिच्या आईवडिलांना अजिबात पटलं नाही. रचिता एका मुलाखतीत म्हणालेली की, "मला ती भूमिका करण्याचा काहीच पश्चाताप नाही. पण माझ्या आईबाबांसाठी मी आजही त्यांची छोटी मुलगी आहे. अशी भूमिका केल्याने त्यांना जरा विचित्र वाटलं. आई म्हणाली होती की, 'मी तुला एक अभिनेत्री म्हणून स्वीकारते पण आता कधीच लेक म्हणून बघू शकणार नाही." आईचे हे शब्द ऐकून मी लगेच त्या दोघांचीही माफी मागितली. "

ती पुढे म्हणाली, "मी त्यांना वचन दिलं की मी यापुढे असे सीन करणार नाही. हे सांगताना मी ढसाढसा रडत होते. आजही माझे वडील मला छोटी मुलगीच मानतात. त्यांनी आनंदी राहावं म्हणून मी हवं ते करते. बाबा नेहमी म्हणतात की माझं कुटुंबच माझ्यासाठी सर्वकाही आहे."

टॅग्स :सेलिब्रिटीTollywood