Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रानौतच्या हेअर स्टायलिस्टला सिनेइंडस्ट्रीत झाले ५० वर्षे पूर्ण, सेटवर केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:42 IST

बॉलिवूडमध्ये गेेल्या ५० वर्षांपासून हेअर स्टायलिस्ट म्हणून मारिया शर्मा कार्यरत आहेत.

बॉलिवूडमध्ये गेेल्या ५० वर्षांपासून हेअर स्टायलिस्ट म्हणून मारिया शर्मा कार्यरत आहेत. कंगना रानौतने मारिया शर्मा यांच्यासोबत फॅशन चित्रपटात काम केलेले आहे. तेव्हापासून ती त्यांना ओळखते आहे. त्यामुळे कंगनाने थलाइवीच्या सेटवर केक आणला होता आणि त्यांना हेअर स्टायलिस्ट म्हणून इंडस्ट्रीत ५० वर्षे पुर्ण झाल्यामुळे सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.

मारिया यांनी कंगनाच्या करियरमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. फॅशन, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई व वोह लम्हे याासारख्या चित्रपटात त्यांनी कंगनाची हेअरस्टायलिस्ट म्हणून काम केले आहे.

मारिया शर्मा यांनी हेमा मालिनी, मनीषा कोईराला, शर्मिला टागोर यांसारख्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे. त्यांनी वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, फॅशन, कंपनी, फूल और कांटे यांसारख्या सिनेमात हेअर स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे. कंगना रानौत हिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो थलाइवी मधील आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. 

थलाइवी चित्रपटाची निर्मिती विष्णु वर्धन इंदूरी आणि शैलेश आर सिंग करत आहेत. विबरी मोशन पिक्चर्स व कर्मा मीडिया अँड एण्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट २६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत