Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौत ‘सुपरगर्ल’च्या आठवणीने व्याकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 06:00 IST

होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’नंतर कंगनाची ‘विश लिस्ट’ तयार आहे आणि यासाठी कंगनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. कंगनाच्या ‘विश लिस्ट’मधील एक गोष्ट खास आहे.

कंगना राणौत सध्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती, या चित्रपटाच्या रिलीजची. येत्या २५ तारखेला कंगनाचा हा बिग बजेट चित्रपट रिलीज होतोय. साहजिकचं या चित्रपटासाठी कंगनाने प्रचंड मेहनत केलीय. अगदी घोडेस्वारी, तलवारबाजी शिकण्यापासून तर दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसण्यापर्यंत कंगनाने सगळे काही केले. आता इतका घाम गाळल्यानंतर कंगना काही क्षण उसंत घेईल, असा तुमचा अंदाज असेल. पण छे, थांबणार, ती कंगना कुठली. होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’नंतर कंगनाची ‘विश लिस्ट’ तयार आहे आणि यासाठी कंगनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. कंगनाच्या ‘विश लिस्ट’मधील एक गोष्ट खास आहे. होय, त्यानुसार, कंगनाला पुन्हा एकदा प्रियांका चोप्रासोबत काम करण्याची इच्छा आहे.

ताज्या मुलाखतीत कंगनाने ही इच्छा बोलून दाखवली. मी प्रियांकासोबत ‘क्रिश 3’मध्ये काम केले आहे. यात तिने एका सामान्य मुलीची भूमिका साकारली होती. पण माझ्या मते, प्रियांका आणि मी आम्ही दोघी ‘सुपरगर्ल’ आहोत. त्यामुळेचं याच कन्सेप्टवर मला तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा आहे. प्रियांका टफ लेडी आहे, मला तिच्यासोबत काम करायला आवडेल, असे कंगना म्हणाली.

 क्रिश हे ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली.  हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. 

टॅग्स :कंगना राणौतप्रियंका चोप्रामाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी